चंद्रपूरमध्ये खाण परिसरात डिटोनेटरचा स्फोट, एक कामगार जखमी

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

चंद्रपूर मधील भटाळी खुल्या खाणीमध्ये डीटोनेटरचा स्फोट होऊन रमेश बालाजी इटनकर नामक कामगार जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून वेकोली प्रशासनातील कामगारांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे.

चंद्रपूर येथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या भटाळी खुल्या खाणीमध्ये स्फोटासाठी डिटोनेटरचा वापर केला जातो. दरम्यान कामगार रमेश इटनकर डीटोनेटर असलेला बॉक्स घेऊन जात असताना अचानक मोठा स्फोट झाला, या स्फोटामध्ये इटनकर गंभीररीत्या जखमी झाले. तत्काळ इतर कामगारांनी त्यांना वेकोली रुग्णालयात दाखल गेले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या