प्रेयसीचा नवरा अचानक घरी आला, तरुणाचे अचानक-भयानक झाले

446
फोटो सौजन्य-http://joy105.com

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

प्रेयसीसोबत तिच्या घरी नको त्या अवस्थेत असलेल्या तरूणाला महिलेच्या नवऱ्याने रंगेहाथ पकडलं. या नवऱ्याने दोघांना ते असलेल्या खोलीमध्ये कोंडून ठेवलं. नवरा आपल्याला सोडणार नाही याची कल्पना त्या तरूणाला आली होती, यामुळे जीव वाचवण्यासाठी या तरुणाने 5व्या मजल्यावरून उडी मारली आहे. चित्रपटातील दृश्याप्रमाणे वाटणारी ही घटना दक्षिण दिल्लीतील जे.जे.कॉलनीमध्ये घडली आहे.

पंकज (वय 29 वर्ष) याचं एका विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंध होतं. मंगळवारी ही महिला एकटी असताना पंकज तिच्या घरी गेला होता. हे दोघे बेडरूममध्ये असताना महिलेचा नवरा घरी आला. त्याने बेडरूमचा दरवाजा उघडताच त्याला आपली बायको दुसऱ्यासोबत असल्याचं दिसल्याने तो जबरदस्त हादरला. त्याने बायकोच्या कानाखाली मारली.आपलं काही खरं नाही हे कळाल्याने महिलेने हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. ही महिला टोकाचं पाऊल घेत असल्याचं पाहून पंकज आणि तिचा नवरा दोघेही तिच्याकडे धावले. आपली बायको नाटक करतेय हे कळाल्याने नवऱ्याने पंकज आणि त्याच्या बायकोला खोलीत बंद करून ठेवलं. तुझ्या बापाला आणि भावाला बोलावतो असं म्हणत महिलेचा नवरा जोरजोरात ओरडत होता. पंकज आणि महिलेने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना दरवाजा उघडता आला नाही.

आपला जीव वाचवण्यासाठी पंकजने बाल्कनीतून पाचव्या मजल्यावर जाण्याचं ठरवलं. तिथे गेल्यानंतर त्याला समोरच प्रेयसीचा नवरा बसलेला दिसला. यामुळे घाबरलेल्या पंकजने पाचव्या मजल्यावरून उडी मारली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. गेली दोन वर्ष पंकज आणि या महिलेमध्ये संबंध होते असं पोलीस तपासात कळालं आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या