संतापजनक! नऊ महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि खून

सामना ऑनलाईन । हैदराबाद

तेलंगणा राज्यातील हनामकोडा भागात एका नरधमाने अवघ्या 9 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय के प्रवीण याला अटक केली आहे.

मंगळवारी एक कुटुंबीय आपल्या घराच्या छतावर झोपले होते. त्यांच्यासोबत त्यांची 9 महिन्यांची मुलगीही होती. रात्री प्रवीण आला आणि या चिमुरडीला घेऊन पळून गेला. नंतर पालकांच्या लक्षात आले की आपली मुलगी गायब झाली आहे. नंतर पालकांनी तिचा शोध घेतला. तेव्हा एका निर्जन ठिकाणी नराधम प्रवीण चिमुरडीवर अत्याचार करत होता.

पालकांनी लगेच त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केला आणि चिमुरडीला इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी प्रवीणला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.