धक्कादायक!हृतिक रोशन आवडतो म्हणून पतीकडून पत्नीची हत्या

1313

 बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची जबरदस्त फॅन असल्याने एका विवाहित महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली असून, पत्नीची हत्या केल्यानंतर पतीनेही स्वत:लाही संपविले.

न्यूयॉर्क शहरातील दिनेश्वर बुध्दीदत्तने (33) शुक्रवारी रात्री पत्नी ‘डॉनी डिजॉय’ची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर दिनेश्वर हावर्ड बीचजवळील एका मैदानात गेला आणि तेथील झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या केली. दिनेश्वर आणि ‘डॉनी’ चे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. आत्महत्या करण्यापूर्वी खुद्द दिनेश्वरने डॉनीच्या बहिणीला मेसेज करून पत्नीची हत्या केल्याचे कळविले होते. त्याच बरोबर त्याने घराच्या शेजारी असलेल्या कुंडीखाली घराची चावी ठेवल्याचे सांगितले. या घटनेपूर्वी, दोन दिवस अगोदर दिनेश्वरला पत्नीवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. डॉनीने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयाकडे संरक्षणाची मागणीदेखील केली होती. या प्रकरणी चौकशी करताना डॉनीच्या मित्रांनी डॉनीला बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आवडत असल्यामुळे दिनेश्वरने तिच्यावर हिंसक हल्ला केला असल्याचे सांगितले. “

आपली प्रतिक्रिया द्या