पुण्यात एका व्यक्तीने आपल्या मेव्हण्यावरकोयत्याने वार वार करून खून केला आहे. घरगुती वादातून आरोपीने हे कृत्य केले आहे. मृत तरुणाचे नाव सूरज भुजबळ असून तो 21 वर्षांचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार सूरजची बहीण संजनाचे आरोपी अमित बहिरट याच्याशी प्रेमविवाह झाला होता. संजना आणि अमित मुंबईत रहायचे. पण अमितला दारूचे व्यसन होते. त्यामुळे संजना अमितला कंटाळून परत पुण्यात माहेरी आली. माहेरी आल्यानंतरही अमित संजनाला त्रास देत होता. या जाचाला कंटाळून संजनाने पोलिसांत तक्रार केली होती.
काही दिवसांपूर्वी सर्व नातेवाईकांनी अमित आणि संजनासोबत बैठक घेतली. तेव्हा संजनाने अमितकडे घटस्फोट मागितला. पण अमितने घटस्फोट द्यायला नकार दिला. तसे जर घटस्फोट हवाच असेल तर पाच लाख रुपये द्या अशी मागणी अमितने केली. पण संजना आणि तिच्या कुटुंबीयांनी अमितची मागणी अमान्य केली. तेव्हा अमितने रागाच्या भरात संजनाच्या आईंना धमकी दिली की मी घटस्फोट तर देणार तर नाही पण तुझ्या मुलाचे तुकडे तुकडे करेन.
सूरजच्या कुटुंबीयांचे दौंडमध्ये कापडाचे दुकान आहे. शनवारी सूरज याच दुकानात बसला होता. तेव्हा अमित कोयता घेऊन दुकानात शिरला आणि सूरजवर जोरदार वार केले. यात सूरज गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मुलगा गेल्यामुळे सूरज्या आई वडिलांनी हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिसांनी अमित आणि त्याचा भाऊ समीर बहिरटला अटक केली आहे.