कर्जाच्या वाढत्या बोझ्यामुळे आजारी पत्नीची केली हत्या, पती बेपत्ता

748

व्यवसायात झालेले नुकसान, कर्जाचा वाढत चाललेला बोझा यामुळे तणावात असलेल्या एका 67 वर्षीय वृद्धाने त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आपणही आत्महत्या करणार असल्याचे या वृद्धाने एका पत्राल लिहून ठेवले आहे. मात्र अद्याप त्याच्या बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पवईतील शिवशक्ती नगर येथे 67 वर्षीय अजित लाड हे त्यांची पत्नी शीला लाड यांच्यासोबत राहायचे. या दाम्पत्याला मूल नसल्यामुळे ते दोघेच त्या घरात राहायचे. अजित लाड यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना या व्यवसायात नुकसान होत होतं. त्यात वर्षभरापूर्वी त्यांनी दोन लाखाचं कर्ज देखील घेतलं होतं. मात्र त्या कर्जाचे हफ्ते त्यांना फेडता येत नव्हतं. त्यात त्यांची पत्नी शीला देखील सतत आजारी असायची. त्यामुळे ते तणावात होते व त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

अजित यांनी लिहलेल्या पत्रात त्यांनी त्यांच्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. ‘मी कर्जबाजारी झालो आहे. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवायचा निर्णय घेतला. मात्र मी माझ्या आजारी पत्नीला मागे एकटं सोडून जाऊ शकत नाही. माझ्या पश्चात तिची काळजी घ्यायला कुणीही नाही’ असे लाड यांनी पत्रात लिहले आहे. सोमवारी त्यांनी त्यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर ते घराबाहेर पडले. अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या