वसईमध्ये मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीची तिच्या प्रियकराने भररस्त्यात निघृण हत्या केली. या भयंकर घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वसईच्या वालीव पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे.
In a tragic incident on Tuesday morning in #Vasai, a girl was severely assaulted with a pipe wrench on her head and chest by a man reportedly known to her.
The girl, dressed in ethnic attire, was seen lying motionless in the middle of the road. The man, reportedly her boyfriend,… pic.twitter.com/cFF8ctnETe
— Mid Day (@mid_day) June 18, 2024
सदर घटना वसईतील चिंचपाडा या परिसरात मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव असे त्या मृत तरुणीचे नाव आहे. रोहित यादव असे तिच्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. रोहितने आपल्या 20 वर्षीय प्रेयसीची लोखंडी पान्याने वार करून हत्या केली आहे. सदर घटनेचा थरार एकाने व्हिडीओमध्ये टिपला. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, पोलिंसांनी या सर्व घटनास्थळाचा पंचनामा करून तेथील पुरावे गोळा केले आहेत. यांच्या प्रेमप्रकरमातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.