पत्नीच्या प्रसुतीसाठी पैसे नाहीत, गुजरातमध्ये हिरे कारागिराची आत्महत्या

830

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक लोक बेरोजगार झाल्याने नैराश्यात आहेत. लॉकडाऊनचा फटका बसलेल्या एका हिरे कारागिराने पत्नीच्या प्रसूतीसाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, इर्शाद जमादार असं या हिरे कारागिराचं नाव आहे. तो सूरत येथे काम करत होता. कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊननंतर त्याची नोकरी गेली होती. त्यात त्याची पत्नी तस्नीम ही नऊ महिन्यांची गर्भवती असल्याने हे जोडपं अपत्यजन्माची स्वप्नंही रंगवत होतं. पण दुर्दैवाने गेल्या दोन महिन्यांपासून बेरोजगार झालेला इर्शाद याला पत्नीच्या प्रसुतीसाठी पैसे जमवता येत नव्हते.

पत्नीच्या प्रसुतीसाठी पैसे जमवू शकल्याचा मानसिक त्रास झाल्याने अवघ्या 26 वर्षांच्या या तरुणाने रविवारी स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या