केवायसी अपडेटच्या बहाण्याने दीड लाखांचा गंडा

फोन पे कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्याने एकाला केवायसी अपडेटच्या बहाण्याने 1 लाख 43 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना 11 ऑक्टोबरला वडगाव बुद्रूक परिसरात घडली. याप्रकरणी श्रीकृष्ण देशपांडे (रा. इम्पायर सोसायटी, वडगाव बुदू्रक) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रहिवाशी आहेत. मात्र, कामानिमित्त ते कुटूंबियासह वडगाव बुद्रूक परिसरात राहतात. ते 11 ऑक्टोबरला घरी असताना सायबर चोरट्याने त्यांना फोन केला. सायबर चोरट्याने त्यांना फोन पे कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन केवायसी अपडेटच्या बहाण्याने बँकखात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर श्रीकृष्ण यांच्या बँकखात्यातून ऑनलाईनरित्या 1लाख 43 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके तपास करीत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या