लातूर – पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करुन धक्काबुक्की

1059

निलंगा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना लातूर येथे घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक गजानन जगन्नाथ क्षिरसागर यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 20 जानेवारी रोजी ते एका गुन्ह्यात गोवर्धन रामराव घारोळे यांना अटक करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्याकार्यालयात गेले होते. त्यावेळी क्षिरसागर याने वाद घातला. त्याला समजावून लातूर येथे अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात नेण्यात आले. परंतु ते कार्यालयात उपस्थित नसल्याने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जावे लागले.

पोलीस अधिक्षक यांच्या घरी चल असे म्हटले असता गजानन क्षिरसागर त्याने उपनिरीक्षकांसह, कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. उपनिरीक्षकांसोबत झटापट केली, त्यांच्या शर्टचे बटन तोडले. सर्वांना बघून घेतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गजानन जगन्नाथ क्षिरसागर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या