भाच्याने मामीच्या पदराला हात घातला, पोलिसात गुन्हा दाखल

3805

कोपरगाव शहरातील येवला रोडवरील बँक कॉलनीमध्ये भाच्याने मामीच्या पदराला हात घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित मामीने दिलेल्या तक्रारीवरून भाच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय दिलीप डावकर ( रा. बँक कॉलनी कोपरगाव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

पीडित विवाहित महिलेने आपण बँक कॉलनी येथे पती व दोन मुलांसह राहात असून आपल्या घराशेजारी आपली भावजय मोहिनी दिलीप डावकर व तिचा मुलगा आपला भाचा आरोपी अजय डावखरे हे दोघे राहतात. बुधवारी रात्री अजय हा दारू शिवीगाळ करू लागला. त्याला समजावून सांगण्यासाठी घराबाहेर गेले त्याने मिठी मारून साडीचा पदर ओढून साडी खेचण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार पीडित महिलेने पोलिसात दिली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात कलम कलम 354(अ), 354(ब), 504 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या