लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीसमोर आई-वडिलांची हत्या

1413
प्रातिनिधिक फोटो

प्रेयसीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आई वडिलांची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेश येथे घडली आहे. लालमणी उर्फ लल्लू असं या हत्येतील आरोपीचं नाव आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुल्तानपूर येथे ही घटना घडली आहे. येथील सलारपूर गावातील लालमणी या तरुणाचे वंदना नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपासून हे प्रेमसंबंध सुरू होते, मात्र, त्यांचा विवाह करून देण्यास दोन्ही कुटुंबांचा विरोध होता. सोमवारी रात्री साडे बारा वाजता लालमणी वंदनाला भेटण्यासाठी तिच्या घरच्या गच्चीवर आला होता. त्याच्या येण्याची चाहुल लागताच तिचे आईवडील जागे होऊन गच्चीवर पोहोचले. तिथे पुन्हा लालमणीने वंदनाशी लग्न करण्याची परवानगी द्या, अशी विनंती केली. त्यावर त्यांनी पुन्हा एकदा नकार दिला.

त्यांचा नकार ऐकताच लालमणी संतापला. त्याने संतापाच्या भरात तिथे असलेल्या धारदार शस्त्राने वंदना समोरच तिच्या आईचा गळा चिरला. त्याला विरोध करायला येणाऱ्या तिच्या वडिलांच्या गळ्यावरही वार केले. वंदनाचे आईवडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तो तिथून फरार झाला. या प्रकरणाबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. लालमणी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या