मागवला ड्रोन, पार्सलमध्ये आले 1 किलो बटाटे; व्हिडीओ व्हायरल

online-fraud

बिहारच्या अमन नावाच्या व्यक्तीने दावा केला आहे की त्याने एका ऑनलाइन साइटवरून ड्रोन कॅमेरा मागवला होता, परंतु त्याऐवजी त्याला पॅकेटमध्ये एक किलो बटाटे मिळाले. अनसीन इंडिया नावाच्या हँडलने शेअर केलेला एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे, ज्यात ही घटना नालंदामध्ये घडल्याचा दावा करण्यात आला आहे.

डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह पॅकेज उघडताना दिसत आहे. ऑनलाइन विक्रेत्याने फसवणूक केल्याचे त्याने यात म्हटले आहे. या व्हिडीओला सामना (Saamana.com) दुजोरा देत नाही.

फसवणूक झालेला ग्राहक चेतन कुमार नावाचा व्यापारी आहे, ज्याने ऑनलाइन शॉपिंग साइटवर ऑर्डर दिल्यानंतर पूर्ण पैसे दिले. डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह जेव्हा पार्सल घेऊन आला तेव्हा कुमारला संशय आला. त्याने पार्सल उघडण्यास सांगितले आणि त्याचा व्हिडीओही बनवला. सीलबंद बॉक्समध्ये 10-20 बटाटे होते.

स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार आल्यास या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.