जन्म देताना माझी परवानगी घेतली का? ‘हा’ व्यक्ती आई-वडिलांवर भरणार खटला

158

सामना ऑनलाईन । मुंबई

लहानपणी प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांना एकदा तरी आम्ही नक्की कुठून आलो? असा प्रश्न केला असेल. अशा वेळी आई-वडील त्या वेळी सुचेल आणि बालसुलभ मनाला पटेल असे उत्तर देऊन वेळ मारून नेतात. काही जण तुला कोण तरी आमच्याकडे सोडून गेले किंवा देवाच्या घरातून आणले असे थातूरमातूर उत्तर देतात. परंतु जर एखाद्या मुलाने आई-वडिलांना मला जन्म देताना तुम्ही माझी परवानगी घेतली होती का? असा प्रश्न केला तर… थोडे विचित्र वाटले ना. पण हो एक असा व्यक्ती आहे आणि ते देखील आपल्या मुंबईत.

मुंबईत राहणारा रफाईल सॅम्यूल नावाच्या एक व्यक्ती आपल्या आई-वडिलांवर परवानगीशिवाय या जगात आणल्याचा आरोप करत खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. सॅम्यूलच्या मते आई-वडील हे त्यांच्या आनंदासाठी मुलांना जन्म देतात. यामुळे आई-वडिलांचे जीवन सुखकर होते, परंतु जन्म दिल्यानंतर मुलांना शाळा, करियर आणि जगभराच्या झमेल्यांमध्ये का टाकतात? मुलांनी थोडीच सांगितले होते की मला जन्म द्या, असा सवाल सॅम्यूल उपस्थित करतो.

सॅम्यूलचे यासंबंधीत अनेक व्हिडीओ यूट्यूबवर आहेत. यात तो आई-वडिलांनी मुलांचे कर्जदार राहायला हवे असे म्हणतो. कारण मुलांच्या जन्मामुळे त्यांचे जीवन समाजात सुखकर होते. त्यांना कोणालाही उत्तर द्यावे लागत नाही. विषेश म्हणजे सॅम्यूलच्या या विचारांचे समर्थन करणारेही लोकं आहेत. यासाठी ते अँटी नेटलिज्म (Anti-Natalism) नावाची चळवळही चालवत असून ते स्वत:ला Voluntary Human Extinction Movement (VHEM) अॅक्टिविस्ट म्हणवतात. ही लोकं चाईल्ड फ्री समाजाची स्थापना करण्याच्या तयारीत असून याच्या प्रचारासाठी त्यांनी एक फेसबुक पेजही तयार केले आहे.

Stop Making Babies आंदोलन
सध्या या लोकांनी Stop Making Babies नावाचे एक आंदोलन छेडले असून या संबंधी अनेक पोस्ट तुम्हाला सोशल मीडियावर दिसतील. याच विचारांची अनेक लोक 10 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये एकत्र येणार असून त्यांनी एका महासभेचे आयोजन केले आहे.

stop-making-baby

आपली प्रतिक्रिया द्या