उघड्यावर संडासाला बसायला विरोध केल्याने तरूणाने काढली बंदूक

49

सामना ऑनलाईन,पानिपत

काही लोकांना कितीही प्रयत्न केले तरी उघड्यावर संडासाला बसण्यापासून परावृत्त केलं जाऊ शकत नाही. उघड्यावरच जाणार असा हट्ट असलेल्या एका तरूणाने तर त्याला हटकणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर बंदूकच ठेवली. हा प्रकार चंदीगडमधील पानिपत इथला आहे. अशोक कुमार नावाचे अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक तरूण उघड्यावर संडासाला बसलेला दिसला. कुमार यांनी या तरूणाला असं न करण्याची समज दिली ,त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झालं मात्र तो तरूण नंतर तिथून निघून गेला. थोड्यावेळाने या तरूणाने आपले साथीदार जमवले आणि अशोक कुमार यांना शोधून काढलं. कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार आधी या तरूणाने आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना मारहाण केली आणि नंतर त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेऊन पुन्हा असं केल्यास परीणाम वाईट होतील अशी धमकी दिली. यानंतर हे सगळे तिथून निघून गेले.

या प्रकारानंतर पानिपत महानगरपालिकेच्या आयुक्त वीणा हुड्डा यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या अज्ञात तरूणाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे,शस्त्रात्र कायदा, मारहाण असे गुन्हे नोंदवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या