लग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं

लग्नबंधन हे सात जन्मांचं बंधन मानलं जातं. पण, सध्याच्या काळात या बंधनाची परिभाषा बदलली आहे. नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात तर चक्क नवऱ्याने लग्नाच्या 17 दिवसांत बायकोला अॅग्रीमेंट (करार) करून प्रियकराकडे सोपवलं आहे.

ही घटना झारखंडच्या रांची इथे घडली आहे. रांचीच्या न्यू आनंद नगर इथे राहणाऱ्या एका तरुणीचा विवाह चिपरा गावातील तरुणाशी 3 जुलै रोजी झाला होता. लग्नानंतर सासरी आलेली ही तरुणी सतत फोनवर बोलत असे. त्यामुळे तिच्या सासरी संशय येऊ लागला.

त्यांनी संशयापोटी तिचा फोन तपासला तेव्हा ती तिच्या प्रियकराशी बोलत असल्याचं त्यांना समजलं. त्यावर तिने आपलं लग्नापूर्वी दीड वर्षं आधीपासून प्रेमप्रकरण असल्याचं समजलं. ते ऐकून तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली.

दोन्ही कुटुंबांनी यानंतर तरुणीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण, ती तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर 19 जुलै रोजी तरुणीच्या माहेरची मंडळी आणि तरुणाने प्रयत्न करून तिला घरी परत बोलवलं. त्यांच्या सांगण्यावरून परत आलेल्या तरुणीच्या मनात अजूनही संभ्रम होता. त्यामुळे तरुणाने तिला परत तिच्या प्रियकरासोबत जाऊ देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाचं एक अॅग्रीमेंटही बनवण्यात आलं. या करारानुसार, तरुणीला जोपर्यंत तिच्या प्रियकरासोबत राहू इच्छिते, तोपर्यंत ती राहू शकते. हा करार नक्की झाल्यानंतर तरुणाने आपल्या बायकोला तिच्या प्रियकराकडे सोपवलं. प्रियकरानेही तिच्यासोबत संसार करण्याची तयारी दाखवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या