वडील, आजोबांची हत्या करुन तरुणाची आत्महत्या; मुलुंडमधील धक्कादायक घटना

crime-spot

मुंबईतील (Mumbai) मुलुंडमध्ये (Mulund) एक हादरवणारी घटना घडली आहे. वडील आणि आजोबांचा खून करून तरुणाने आत्महत्या केली आहे. शार्दूल मांगले (22 वर्षे) असं या तरुणाचं नाव आहे. हा प्रकार मुलुंड पश्चिमेला असलेल्या वसंत ऑस्कर इमारत संकुलात घडला आहे.

शार्दूलने शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास त्याच्या आजोबांवर हल्ला केला. त्याचे आजोबा सुरेश मांगले हे अंथरुणाला खिळून होते. शार्दूलने त्यांच्या पोटात धारदार शस्त्र भोसकून ठार मारलं. हे बघून शार्दूलचे वडील घाबरलेल्या अवस्थेत त्याच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करायला लागले. आजोबांना ठार मारल्यानंतर शार्दूलने त्याचे वडील मिलिंद यांच्यावर हल्ला केला. त्यांचा मृतदेह घराबाहेर असलेल्या पायऱ्यांवर सापडला आहे. सुरेश यांच्या देखभालीसाठी एक व्यक्ती ठेवली होती. शार्दूलने केलेला हल्ला पाहून ती बाथरूममध्ये लपून बसली होती, ज्यामुळे तिचा जीव वाचला आहे. शेजारच्यांनीही शार्दूलला त्याच्या वडिलांना ठार मारताना पाहिलं असल्याचं कळालं आहे. शार्दूलने असं का केलं, याचा शोध लावण्याचं काम पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या