पत्नीचे बॉयफ्रेंडसोबतचे अश्लीला व्हिडीओ व्हायरल, पतीने केली तिची निर्घृणपणे हत्या

murder-knife

पत्नीचे सोशल मीडियावर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे अश्लीला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका पतीने त्याच्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात पोहोचला असून तो पोलिसांना शरण आला आहे. ठाण्यातील नागाव भागात ही घटना घडली आहे.

रफिक मोहम्मद युनुस असे त्या पतीचे नाव असून तो पत्नी व मुलांसह भिवंडी येथे राहायचा. लॉकडाऊनमध्ये युनुसची नोकरी गेल्यावर त्याची पत्नी त्याला सोडून बहिणीकडे निघून गेली. त्या दरम्यान नसरीनचे सद्दाम नावाच्या व्यक्तीसोबत अफेयर सुरु झाले. त्यांच्यात अनैतिक संबंध देखील होते. त्या दोघांचे अश्लील व्हिडीओ तसेच नसरीनचे न्यूड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते व्हिडीओ रफिकने पाहिले. त्यामुळे तो प्रचंड संतापला होता. त्यामुळे त्याने थेट पत्नीच्या बहिणीचे घर गाठले व पत्नीवप चाकूने सपासप वार केले. त्यानंतर तो थेट शांती नगर पोलीस ठाण्यात गेला व तिथे त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला

आपली प्रतिक्रिया द्या