‘मौल्यवान’ पॉर्न व्हिडीओ नष्ट केल्याने मुलाची वडिलांकडे 60 लाखांच्या भरपाईची मागणी

316
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण जगभरामध्ये वाढल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सर्व्हेतून सिद्ध झाले होते. विकृत आणि हिडीस प्रकारचे व्हिडीओ पाहण्याचे तरुणांना व्यसन लागल्याचे या सर्व्हेतून सांगितले होते. आता याच संदर्भात अमेरिकेतून एक बातमी आली आहे. मिशीगन येथील एका व्यक्तीने आपल्या पालकांविरोधात 60 लाखांचा दावा ठोकला आहे. पालकांनी आपला ‘मौल्यवान’ पॉर्न व्हिडीओंचा साठा नष्ट केल्याचा आरोप या मुलाने केला आहे.

पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत हिंदुस्थान तिसरा

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दावा केलाला मुलगा आपल्या पालकांचे घर सोडून दुसरीकडे राहायला गेला होता. परंतु त्याचे पॉर्न कलेक्शन त्याच घरात राहिले होते. हे पॉर्न कलेक्शन परत घेण्यासाठी आला असता ते नष्ट करण्यात आल्याचे त्याला दिसले. याचा संताप आल्याने मुलाने पालकांना न्यायालयात खेचले आणि ते व्हिडीओ ‘मौल्यवान’ होते असेही सांगितले. सध्या या मुलाचे आणि त्याच्या पालकांचे नाव समोर आलेले नाही. परंतु त्याच्या वडिलांनी या प्रकरणानंतर मुलाच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुलाने न्यायावलयात सांगितले की, घरात 12 पेक्षा अधिक खोक्यांमध्ये 20 लाख रुपये किंमते पॉर्न कलेक्शन होते. पालकांनी ते नष्ट केल्याने त्यांच्याकडून 60 लाखांची नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी मुलाने केली आहे. मुलाच्या आरोपानंतर वडिलांनी पॉर्नच्या जागी कोकीन असते तरी ते देखील नष्ट केले असते असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या