गुप्तांगाला कुलुप लावलं आणि चावी हरवली, लॉकडाऊनमध्ये घरी राहून कंटाळलेल्या युवकाचे आचरट चाळे अंगाशी आले

थायलंडमध्ये राहणाऱ्या एका युवकाने स्वत:सोबत केलेले विचित्र चाळे त्याच्या अंगाशी आले आहेत. हा युवक 38 वर्षांचा असून तो कंटाळला होता. कोरोना काळात बाहेर जाणं त्याला भीतीदायक वाटत असल्याने तो बहुतांश काळ घरातच असायचा. या युवकाच्या आईने सांगितलंय की तिचा मुलगा हा एकलकोंडा होता. त्याला प्रेयसी नसल्याने आयुष्यात त्याला फार एकटेपणा वाटत होता.

एकाकी जीवन जगत असलेल्या या तरुणाला विचित्र सवय होती. त्याच्या आईला त्याने सांगितलं होतं की तो लहान-लहान छिद्रांमध्ये आपले गुप्तांग घुसवण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे त्याची आई त्याच्यावर संतापली होती आणि तिने त्याला पुन्हा असं न करण्याची ताकीद दिली होती. जवळपास दोन आठवड्यांपूर्वी त्याने एक कुलूप घेतलं आणि गुप्तांगाभोवती ते अडकवून घेतलं. दुर्दैवाने या तरुणाकडून कुलूपाची चावी हरवली. जवळपास 2 आठवडे त्याने याच अवस्थेत काढले. यानंतर मात्र त्याला वेदना असह्य व्हायला लागल्याने त्याने त्याच्या आईला सांगितले. आईने डॉक्टरांना फोन केला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला.

गुरुवारी डॉक्टरांचं पथक या तरुणाचा घरी पोहोचलं आणि त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून घेतलं. यानंतर त्यांनी हे कुलूप काढायच्या अत्यंत किचकट गोष्टीला सुरुवात केली. त्यांनी कटरच्या सहाय्याने हे कुलूप कापायचं ठरवलं . हा तरुण वेदना असह्य व्हायला लागल्याने जोरजोरात ओरडत होता. अशा अवस्थेत कुलूप कापणं डॉक्टरांसाठी अवघड काम बनवलं होतं. जवळपास 30 मिनिटांनंतर हे कुलूप कापण्यात डॉक्टरांना यश आलं. यानंतर डॉक्टरांनी या तरुणाला वेदना कमी करण्यासाठी औषधं दिली. कुलूप इतके दिवस अडकल्याने या तरुणाच्या गुप्तांगाला बरीच इजा झाली असून ते विद्रुप झाले आहे. ते पुन्हा पुर्ववत होण्याची शक्यता ही कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या