वनविभागातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

952

वन विभागातील वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर येथे घडली आहे. मला वरिष्ठ अधिकारी खूप त्रास देत असून नोकरीवर पुन्हा रुजू करण्यासाठी पैश्याची मागणी करीत असल्याचा आरोप त्या तरुणाने केले आहे. गणेश झोम्बाडे असे त्या तरुणाचे नाव असून त्याने आत्महत्येआधी आधी वडिलांना फोन करून या कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.

गणेश हा मूळचा चिखलदरा येथील रहिवासी, त्याची वनरक्षक पदावर नियुक्ती झाल्यावर जुनोना येथे वनविकास महामंडळ पश्चिम येथे वनरक्षक होता. 16 महिन्यापूर्वी वनविभागाचे काही पैसे बँकेत भरण्यास 1 महिना उशीर झाल्याने अधिकाऱ्यांनी गणेशला निलंबित केले होते. तेव्हापासून तो मानसिक तणावाखाली होता. निलंबित झाल्यावर अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे एका महिन्यात गणेशाच्या प्रकरणाची चौकशी करून त्याची बदली करायला हवी होती, परंतु वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे गणेशला तब्बल 16 महिने निलंबित राहावे लागले. त्याला नोकरीवर पुन्हा रुजू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेशला पैशांची मागणी करत त्रास द्यायला सुरुवात केली होती. वनविभागातील अश्या अधिकाऱ्यांच्या वागण्याने गणेशने आपल्या क्वार्टर मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या