लग्नास नकार दिल्यास तरुणीवर अॅसिड हल्ल्याची धमकी

लग्नास नकार दिल्यास वडिलांना ठार मारुन तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिल्याची घटना हडपसरमधील महादेवनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरुण बाबासाहेब खडतरे (रा. येरवडा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीची अरुणसोबत तोंडओळख आहे. त्याचा गैरफायदा घेउन अरुण 20 ऑक्टोबरला तरुणीच्या घरी गेला. त्याने तरुणीचा विनयभंग करुन तिच्या आई-वडिलांना ढकलून दिले. लग्नाला होकार दिला नाही तर वडिलांना ठार मारेन अशी धमकी त्याने या महिलेला दिली होती. याशिवाय तिच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत घरातील साहित्याची तोडफोडही केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या