Video – तोंडाला मास्कऐवजी साप बांधला, बसमधल्या प्रवाशांची बोबडी वळली

कोरोनापासून बचावासाठी मास्क बांधणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे जगभरातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. उच्च कोरोना काळात आपल्याला प्रतीच्या मास्कप्रमाणेच फॅशनेबल, रंगीबेरंगी मास्कही पाहायला मिळाले. लोकांनी आपल्या आवडीवनिवडीप्रमाणे मास्क वापरायला सुरुवात केली आहे. मात्र या काळात एक माणूस असा पाहायला मिळाला जो मास्क ऐवजी साप तोंडाला साप बांधून फिरत होता.

हा व्हिडीओ इंग्लंडमधील मॅन्चेस्टरमधल्या स्विंटन भागातील आहे. बसमध्ये हा माणूस तोंडाला साप बांधून फिरत असल्याने सहप्रवासी हादरले होते. त्यातल्याच एका प्रवाशाने हा व्हिडीओ काढला आहे. एका प्रवाशाने मॅनचेस्टर इव्निंगला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की सुरुवातीला त्याला फॅन्सी मास्क वाटला होता. मात्र सापाने वळवळ करायला सुरुवात केल्यानंतर त्याला कळालं की तो मास्क नाहीये. बससेवा पुरवणाऱ्या स्टेजकोचच्या प्रवक्त्यांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रवाशांची सुरक्षितता ही आमच्यासाठी महत्वाची असून या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे या प्रवक्त्याने सांगितले आहे. प्रवाशांनी सार्वजनिक वाहनांतून प्रवास करताना सरकारच्या निर्देशानुसार मास्क वापरणं अत्यंत गरजेचं असल्याचं या प्रवक्त्याने म्हटले आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून यामध्ये बसमधील सीसीटीव्ही दृश्ये तपासली जात आहेत, तसेच बसच्या चालकाचा जबाबही घेतला जात आहे.

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी N95 मास्क प्रभावी असल्याचे इस्रोच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. तसेच व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मास्क लावणे गरजेचे असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर हवेच्या माध्यमातून विषाणूचा प्रादुर्भाव जास्त होते असेही वैज्ञानिकांनी म्हटले आहे. इस्रोचे पद्मनाभ प्रसन्ना सिम्हा राव यांनी खोकल्यापासून विषाणूंचा जो प्रादुर्भाव होतो त्याचा अभ्यास केला आहे. कोरोना व्हायरस रोखण्यात N95 मास्क सर्वाधिक प्रभावी असल्याचा निष्कर्ष त्यांनी अभ्यासातून काढला आहे.

खोकला आणि शिकेंमुळे जे विषाणू पसरतात N 95 मास्कमुळे त्याचा प्रभाव 10 पटीने कमी होतो. तसेच त्याचा प्रसार 0.1 ते 0.25 मीटरपर्यंतच सीमीत राहतो. जर तुम्ही मास्क नाही लावला तर हा विषाणू तीन मीटरपर्यंत पसरू शकतो. एक साधारण मास्कही हा वेग 0.5 मीटरपर्यंत कमी होतो.सिम्हा म्हणाले की एखादा मास्क विषाणूचे सर्व कण फिल्टर नही करू शकत पण त्याच प्रादुर्भाव नक्की रोखू शकतो. जर तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा मास्क नसला तरी चालेल कारण कुठलाही मास्क विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत करतोच. त्यामुळे मास्क वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या