‘सेक्स ट्रिप’वर जाणाऱ्या व्यक्तीला ३३० वर्षांचा कारावास

104

सामना ऑनलाईन। फ्लोरिडा

सेक्स ट्रिपवर जाणाऱ्या एका व्यक्तीला चाईल्ड पॉर्नोग्राफीच्या आरोपाखाली येथील न्यायालयाने ३३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. डेव्हिड लिंच असे त्याचे नाव आहे. डेव्हिड वरचेवर सेक्स ट्रिपसाठी फिलिपाईन्सला जायचा. तिथे तो ६ वर्षापर्यंतच्या मुलांबरोबर लैंगिक चाळे करायचा आणि त्याचा व्हिडीओ सोशल साईटवर टाकायचा.

२००५ सालापासूनच तो ऑनलाईन डेटींग अॅपवर अल्पवयीन मुलांबरोबरच्या अश्लिल चाळ्यांचा व्हिडीओ अपलोड करत होता. याप्रकरणी एकाने त्याच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र चाणाक्ष डेव्हिड पोलिसांच्या कचाट्यात येत नव्हता. अखेर २०१६ ला फिलिपाईन्सच्या फ्लाईटमध्ये चढताना त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. मात्र त्याला आता शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचे घरही जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या