70 रुपयाचे कंडोमचे पाकिट पडले तीन लाख रुपयांना, वाचा काय घडले या तरुणासोबत

एका तरुणाला घाई गडबडीत कंडोमचे पाकिट विकत घ्यायला जाणे चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने मेडिकलमध्ये जाताना स्कुटीची चावी स्टार्टरलाच विसरला त्यानंतर एका चोराने त्या गाडीची डिक्की खोलून त्यातील त्याची बॅग चोरी केली. त्या बॅगेत तब्बल तीन लाख रुपये होते. बिहारमधील भागलपूर शहरात हा प्रकार घडला आहे. तसेच हा प्रकार ज्या व्यक्तीसोबत घडला तो हवाईदलातील जवान असल्याचे समजते.

सदर व्यक्तीने शहरातील घंटाघर येथील पोस्ट ऑफिसमधील 3 लाख 10 हजार रुपये काढले. त्यानंतर घरी जात असताना त्याने रस्त्यात काही सामान घेतले व नंतर घंटाघरजवळील मेडीकलमध्ये कंडोम विकत घ्यायला गेला. मात्र कंडोम घ्यायच्या नादात तो स्कुटरची चावी स्टार्टरलाच विसरला. याचाच फायदा एका चोरट्याने घेतला व त्याने डिक्की खोलून त्यातील बॅग घेऊन पसार झाला.

सदर व्यक्ती कंडोम घेऊन परतला तर त्याला स्कुटरची चावी डिक्कीला दिसली. त्याने डिक्की उघडून पाहिले तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने डिक्कीत ठेवलेली पैशांची बॅग गायब होती. त्यानंतर त्याने तत्काळ घंटाघर पोलीस ठाण्यात फोन केला व याबाबत कळवले. तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांनी मेडिकलचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले मात्र त्याचा फार काही उपयोग झाला नसल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या