अबब! ‘या’ व्यक्तीच्या पोटाचा आकार गरोदर महिलेसारखा, तपासणीत धक्कादायक बाब उघड

जगभरात वेगवेगळे आजार असतात. त्यात कोणाला काय आजार होईल सांगता येत नाही. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला असाच काहीसा आजार झाला आहे, ज्याने त्याचा पोटाचा आकार एखाद्या गरोदर महिलेच्या पोटासारखा दिसू लागला. डाएट करुनही पोटाचा आकार कमी न झाल्याने इसमाने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यावेळी तपासणी केली असता भयंकर बाब समोर आली.

ब्रिटनमधील वार्रेन हिग्स (54) नावाच्या व्यक्तीच्या पोटाचा आकार अचानक वाढायला लागला. त्यामुळे लठ्ठपणा समजत त्याने डाएट सुरु केलं. डाएट करुन पोटाचा आकार कमी होत नसून तो वाढतच होता. अशावेळी नेमके असे का होत आहे यासाठी त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या काही चाचण्या केल्या असता हिग्सच्या मुत्रपिंडाचा आकार इतका वाढला आहे की त्याचा परिणाम हिग्सच्या फुफ्फुस, हृदय आणि पोटावर होत आहे. त्याला झालेल्या आजाराला पॉलीसिस्टिक असं म्हटलं जातं. यामुळे व्यक्तीच्या मूत्रपिंडात पाण्याने भरलेल्या पिशव्या फुगायला सुरुवात होतात. याबरोबरच मूत्रपिंडावर एक गाठ होते जी सतत वाढत जाते. हिग्सलाही हाच आजार असल्याचे समोर आले आहे.

हिग्सला आता जीव वाचवण्यासाठी पुढील महिन्यात शस्त्रक्रियेद्वारे मूत्रपिंड काढावे लागणार आहे. तरच त्यांचा जीव वाचू शकतो. त्याच्या डाव्या मूत्रपिंडाचा आकार 42 सेमी आहे तर उजव्या मूत्रपिंडाचा आकार 49 सेमी आहे. आजपर्यंत जगातील कोणत्याही व्यक्तीचे मूत्रपिंड इतके मोठे झाले नाही.

हिग्सच्या मुत्रपिंडामुळे त्याचे पोट फुगत चालले आहे. पाच वर्षांपूर्वी त्याला मुत्रपिंडाच्या आजारामुळे अर्धांगवायू झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत हिग्सच्या मूत्रपिंडाचा आकार पाचपटीने वाढला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुत्रपिंडाचा आकार वाढण्याची ही पहिलीच घटना नाहीय. याआधीही एका माणसाला असा आजार झाल्याने त्याचे मूत्रपिंड काढण्यात आले होते. त्याच्या किडणीचे वजन साडेसात किलो झाले होते. हिग्स यांच्यावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया फार खर्चिक आहे. त्यासाठी ते फंड जमा करत आहेत.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की लोकांच्या किडनीचा आकार एका मुठीएवढा असतो आणि त्यांच्या किडनीचा आकार खूप मोठा आहे. त्यांच्या किडनीच्या आकारामुळे फुफ्फुस आणि हृदयावर त्याचा परिणाम होत आहे. त्यांना हालचाल करायला आणि श्वास घ्यायला त्रास होत आहे. मात्र शस्त्रतक्रियेनंतर ते सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात, अशी अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या