व्यवस्थापन शास्त्र

विविध प्रकारच्या संघटनांमध्ये व्यवस्थापन पदावर काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होण्याकरिता या अभ्यासक्रमाची आवश्यकता असते.

नियुक्ती आणि इंटर्नशिप

बहुतेक विद्यापीठ व्यवस्थापन पदवीकरिता ४ वर्षांच्या अभ्यासाक्रमासाठी ११ महिन्यांकरिता प्लेसमेंटची संधी देतात. यामुळे मॅनेजमेंट स्टडीजच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना संधी मिळते. याशिवाय व्यावसायिक धोरणांना बळकट करण्याचे ज्ञानही प्राप्त होते. मार्केटिंग (विपणन) या क्षेत्रात ब्रँड व्यवस्थापक, इ-कॉमर्स विश्लेषक, बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक व्यवस्थापक, मानव संसाधन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय भरती सल्लागार, प्रशिक्षण समन्वयक, प्रकल्प विश्लेषक अशा क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.

व्यवस्थापन म्हणजे नियोजन. ज्याच्याकडे उत्तम नेतृत्वगुणाच्या जोडीला लोकांकडून काम करून घेण्याची क्षमता आहे. जो इतरांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो किंवा व्यवस्थापनाची ज्याला आवड आहे. असे विद्यार्थी व्यवस्थापन शास्त्र्ाात शिक्षण घेऊन आपले करियर घडवू शकतात. बरेचसे उद्योग समूह, औद्योगिक क्षेत्र, संघटना यांना आपले कार्य पुढे नेण्यासाठी उत्तम व्यवस्थापकाची आवश्यकता असते. त्याकरिता व्यवस्थापन शास्त्र (मॅनजमेंट स्टडीज) या विषयात पदवी संपादन करण्याची आवश्यकता असते. व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे.

विद्यापीठ

गुरुनानक इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, माटुंगा (पूर्व)

ससमिरा इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट स्डडीज, वरळी

मॅनेजमेंट इन्स्टिटय़ुट, पुणे

आपली प्रतिक्रिया द्या