इंदापूर अर्बन बँकेच्या कर्जबाजारी संचालकांची आत्महत्या

24
file photo

सामना प्रतिनिधी, रेडा

इंदापूर अर्बन बँकेचे संचालक तथा बेलवाडी येथील शेतकरी वसंत सोपान पवार (४८, रा. बेलवाडी) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाटबंधारे विभागाच्या गैरकारभारामुळे नीरा डाव्या कालव्यातून गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही वेळेवर शेतीसाठी पाणी मिळाले नाही, त्यामुळे डोळ्यांदेखत पिके जळत असून डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांनी आत्महत्या केली.

पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर आणि शेतीच्या औषधे व खतांचे दुकान आहे. तसेच त्यांची लासुर्णे व बेलवाडी परिसरात शेती आहे. दरम्यान, शनिवारी (२१) ते दुकान बंद केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी गेले नाही. त्यामुळे घरातील सदस्यांनी त्यांचा शोध घेतला. आज सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदार वस्तीजवळील विहिरीमध्ये पाण्यावर तरंगत असल्याचा दिसून आला.

आपली प्रतिक्रिया द्या