माणगावमधील कंपनीत भीषण स्फोट, 18 जण होरपळले; 5 गंभीर

1345

माणगाव तालुक्यातील विळे भागड भागातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या क्रिप्टजो प्रा. लि. कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन 18 कर्मचारी होरपळल्याची घटना पाच वाजण्याच्या सुमारास घडली. यातील पाच कर्मचारी हे गंभीर भाजल्याने त्यांना मुंबई जे जे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर इतर कर्मचाऱ्यांवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

क्रिप्टजो कंपनी ही आग विझविण्यासाठी आवश्यक असलेली सिस्टम बनवणारी कंपनी आहे. ही सिस्टम गॅसच्या साहाय्याने तयार केली जाते. आज दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये या सिस्टिमचा डेमो अधिकारी आणि कर्मचारी करीत असताना अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रुद्र रूप धारण केले आणि आग डेमो केलेल्या खोलीच्या बाहेर आली. त्याचवेळी डेमो रूमच्या बाहेर उभे असलेले 18 कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन होरपळले गेले.

जखमी झालेल्यांची नावे
आशिष, सुनील रेगोटे वय – 36 , शुभम जाधव वय -23, सूरज उमटे वय 23, किशोर कारगे वय 30, चेतन कारगे वय 28, राकेश हळदे वय 30, कैलास पडावे वय 32, रूपेश मानकर वय 25, सुरेश मांडे वय 24, प्रसाद नेमाणे वय 23, वैभव पवार वय 26, राजेश जाधव वय 28, आकाश रक्ते वय 20 ,मयुर तामणकर वय 24 ,रजत जाधव वय 23 प्रमोद म्हस्के वय 23, सुनील पाटील हे जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या