वाडातर, पडवणे, पालये येथे आंबा कलमबागांना आग, बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

बागा आगीच्या भक्ष्यस्थानी, बागायतदारांचे करोडो रुयांचे नुकसान याची पाहणी शिवसेना नेते श्री भैरीभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे, शिवसेना देवगड उपाध्यक्ष नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, युवासेना प्रमुख गणेश गावकर यांनी आंबा बागायतदारांसमवेत पाहणी केली. यावेळी या बागायतींच्या परिसरतील कित्येक पशुपक्षी आगीच्या वणव्यात होरपळून मृत्युमुखी पडले.

या वणव्यात हजारो कलमे आंबा पिकासह जळून खाक होऊन लाखो बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. असून प्रशासकीय यंत्रणेमार्फत अपेक्षित असे सहकार्य न होता पाहणी करण्याव्यतिरिक्त रीतसर पंच यादी घातली गेली नसल्याने बागायतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही आग बागेमधून गेलेल्या विद्युतवाहिनीमधून ठिणगी पडून बागायतीमध्ये आग लागल्याचे चर्चा ऐकू येत आहे.

या अचानक लागलेल्या आगीमध्ये वाडातर पडवणे सडाभागात असलेल्या वाडातर, पडवणे, पालये भागातील बागायतदारांच्या आंबा कलमबागा होरपळून बागायतदारांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी सकाळी 11 वा.सुमारास घडली. वाऱ्यामुळे आग सर्वत्र पसरल्याने आग विझविणे बागायतदारांच्या आटोक्याबाहेर गेले. यामुळे बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ऐन हंगामात तयार झालेला आंबाही होरपळून गेल्याने बागायतदारांवर आस्मानी संकट कोसळले.

वाडातर, पडवणे सडाभागात शनिवारी सकाळी अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. वाऱ्यासारखी आग पसरली. यामध्ये आंबा कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बागायतदारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये वाडातर येथील दत्तात्रय वाडेकर, काका ढोके, अजित ढोके, विलास ढोके, सुनिल फडके, राजाराम भाबल, कृष्णा जुवाटकर, विनायक जुवाटकर, पडवणे येथील देवदत्त सूर्यकांत जाधव, देवगडमधील प्रसाद मांजरेकर तसेच पालये येथील बागायतदारांच्या बागा, कलमे आगीत होरपळली. यामध्ये कलमांवर तयार झालेले आंबा पीकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.