कोरोनामुळे यंदा आंबा दलालमुक्त झाल्याने बागायतदारांना फायदा – विनायक राऊत

749

लॉक डाऊन कालावधीतही 14 हजार मेट्रिक टन आंबा विक्री झाला आहे. तर 1 हजार मेट्रिक टन आंब्याची मागणी आली आहे. कोरोनामुळे यावर्षी प्रथमच आंबा दलाल मुक्त झाला असून थेट ग्राहकापर्यंत गेला आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना फायदा झाला असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली.

कोरोना व्हायरसमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक उद्योग व्यवसाय यांना याचा फटका बसला आहे. तसेच या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायत दारांवर मोठे संकट उभे राहिले होते. लॉक डाउन मुळे उत्पादित आंबा कोठे ? आणि कसा ? विक्री करावा असा प्रश्न आंबा बागायतदारांसमोर निर्माण झाला होता. आंब्याची वेळीच विक्री न झाल्या आंबा सडण्याची भीति निर्माण झाली होती. यामुळे आंबा बागायतदार चिंत्तेत सापडला होता. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर विक्री करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी शासनाकडे केली होती. या मागणी नुसार खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील आंबा अन्य ठिकाणी विक्रीसाठी जावा आणि जिल्ह्यातील आंबा बागायतदांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. शासनाच्या सहकार्यातून आंबा वाहतूक करण्याचा मार्ग मोकळा करत थेट आंबा ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या माध्यमातून 14 हजार 816 मे. टन आंब्याची जिल्ह्या बाहेर आणि राज्यात विक्री करण्यात आली आहे. तर आणखी 1 हजार मे टन आंब्याची मागणी आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच कोरोनामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचा आंबा थेट ग्राहकांपर्यंत गेला. त्यामुळे मधील दलाल संपुष्टात आल्याने आंबा बागायतदारांना चांगला फायदा ही झाला त्यामुळे आंबा बागायतदार समाधानी आहे. कोरोनाने आंब्याला दलाल मुक्त केल्यामुळेच बगायतदारांना फायदा झाला असून ही पद्धत यपुढेही राबविण्यात यावी अशी मागणी आंबा बागायतदारांकडून होत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आंबा विक्रिचे श्रेय खासदारांनाच
कोरोनामुळे संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांना आंबा विक्री करण्यास परवानगी देऊन तारण्याचे काम खासदार विनायक राउत यांनी केले आहे. आंबा वाहतूक सुरु करण्यास खासदारांनी प्रयत्न केले त्यामुळे आंबा विक्री आणि वाहतूक श्रेय खासदार विनायक राऊत यांचेच असून त्याचे श्रेय इतरांनी घेवू नये असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

काजू पिकाला हमीभाव मिळण्यासाठी प्रयत्न करणार
कोरोना कालावधीत काजू बागायतदारांचे ही नुकसान झाले आहे. तर दरवर्षी काजू पिक दरात चढ़ उतार होत असतात. त्यामुळे गोवा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही काजू पिकाला हमी भाव मिळावा यासाठी आपन प्रयत्न करणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या