मसुरेत लागलेल्या आगीत आंबा-काजूची कलमे जळून खाक

32

सामना ऑनलाईन, मालवण

मालवण तालुक्यातील मसुरे भोगलेवाडी सडा येथे मंगळवारी (२४) दुपारी आग लागण्याची घटना घडली. वारा आणि उन्हामुळे आग भडकत काही अंतरावरील आंगणेवाडी पठारापर्यंत पोहोचली. या आगीत पठारावरील आंबा-काजूच्या बागा जळुन गेल्या. दोन ते तीन तासांनी ग्रामस्थांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र  १५० मोहर आलेली आंबा-काजु कलमे जाळुन गेल्याने शेतकरी व बागायतदार यांचे एक लाखाहुन अधिकचे नुकसान झाले आहे.

भडकलेल्या आगीत उत्तम भोगले, बाबु भोगले, रश्मी चव्हाण, विकास सावंत, देविदास शिरसाट या शेतकर्यांची मोहर आलेली कलमे जळुन गेली. त्यामुळे ऐन हंगामात शेतकरी हवालदिल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात मंगेश आंगणे, आबा आंगणे, गणेश आंगणे, संतोष आंगणे, उत्तम भोगले, बाबु भोगले, बबन आंगणे व अन्य ग्रामस्थांनी पाणी व झाडांच्या फांद्यांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीचे नेमके कारण समजु शकले नाही.

 

आपली प्रतिक्रिया द्या