आंब्याचे फोटो सोशल मीडियावर टाकणं पडलं महागात; काही वेळात 2.5 लाख रुपये/किलो किमतीचे आंबे चोरीला, मालक हैराण

 

ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यातील एका आमराईतून जागतिक बाजारपेठेत तब्बल 2.5 लाख रुपये प्रतिकिलो किंमत असलेल्या आंब्याची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीतील महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावर आंब्याचे फोटो शेअर केल्यानंतर काही वेळातच ही चोरी झाल्याचं मालकानं म्हटलं आहे.

लक्ष्मीनारायण यांची एक प्रयोगशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांच्या आमराईत त्यांनी 38 पेक्षा जास्त प्रकारच्या आंब्यांची लागवड केली. त्यांच्या आमराईत पिकलेल्या आंब्यांना जागतिक बाजारपेठेत तुफान मागणी आहे. उत्साहाच्या भरात ते भारावून गेले आणि त्यांनी ही माहिती जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मीनारायण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषतः मौल्यवान आंब्याच्या झाडाचा फोटो अभिमानानं पोस्ट केल्यानंतर लगेचच ही घटना घडली.

फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या एका दिवसात, त्याच्या आमराईतून मौल्यवान आंबे चोरीला गेले.

या चोरीमुळे कृषी उत्पादनांच्या सुरक्षेबद्दल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता निर्माण झाली आहे.