ऑनलाइनची रंगीबेरंगी दुनिया

72

>> – पूजा तावरे, फॅशन डिझायनर

ऑनलाइन खरेदी ही गोष्ट आता तशी नवीन राहिलेली नाही. दुकानात न मिळणाऱ्या दुर्मिळ गोष्टी ऑनलाइनवर सहज मिळून जातात.

कामाचा व्याप तसंच रोजची धावपळ यामुळं शॉपिंग आणि इतर गोष्टींसाठी वेळ काढणे आपल्यासाठी कठीण झाले आहे. मात्र सध्याचा जमाना फास्ट आणि टेक्नोसेव्ही झाला आहे. सर्वच गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड हिट झाला आहे. घरबसल्या इंटरनेटवर एखादी गोष्ट ऑर्डर करणं सहज शक्य झाले आहे. अवघ्या काही क्षणांत आपल्या आवडीची गोष्ट निवडणं, हव्या त्या किमतीची वस्तू पसंत करणे आणि त्याचं बिल चुकवणंही सोपं झाले आहे. या ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ साऱ्यांमध्येच असली तरी महिलांमध्ये हा ट्रेंड सर्वात जास्त पाहायला मिळतो आहे.

ज्वेलरी
ग्राहकांना आकर्षित करणारे आणि युनिक अशा प्रकारच्या ज्वेलरी ऑनलाइन पाहायला मिळतात. मग त्यामध्ये फॅब्रिक ज्वेलरी, टेंपल, एथनिक असे अनोखे प्रकार पाहायला मिळतात. हवा तो रंग, डिझाईन, साईजचा पर्यायही उपलब्ध असतो. मात्र यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची असते, या प्रकारच्या ज्वेलरीची गुणवत्ता व युनिक डिझाईन. तरीही ऑनलाइनवर ज्वेलरी खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसून येतो.

गिफ्ट्स आयटम
ऑनलाइन शॉपिंगमध्ये कॉस्मेटिक, कपडे, मोबाईल, ज्वेलरी यांसारख्या वस्तूंबरोबर गिफ्ट्स खरेदीला मागणी दिसून येत आहे. वाढदिवस, लग्नसमारंभ, व्हॅलेंटाईन डे, मदर्स डे, फादर्स डे यांसारख्या प्रसंगी मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना ऑनलाइन शॉपिंग करून गिफ्ट्स पाठवणेही सोपे असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ दिसून येते. गिफ्टसाठी गिफ्टस्, गिफ्टकार्ट, गिफ्टस्बायमीता, गिफ्टिंग नेशन या वेबसाईट पाहू शकता.

कॉस्मेटिक
डिस्काऊंटमध्ये मिळत असल्याने ऑनलाइन कॉस्मेटिक खरेदीची महिला आणि विशेषतः तरुणींमध्ये क्रेझ दिसून येतेय. यात लिपस्टिक, फाऊंडेशन, क्रीम, आयलाईनर, क्लिनिंझ मिल्क, बॉडी लोशन, लिप ग्लॉस-लाईनर, फेस पावडर, ब्लशर, नेलपॉलिश खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. त्वचेला सूट होईल अशा तसेच असंख्य प्रकारच्या लिपस्टिकच्या शेड्स पाहायला मिळतात.

युनिक आऊटफिटस्
ट्रडिशनल,लाँग आणि शॉर्ट लेंथचे कुर्ते, साडीचे काठ लावलेले, फॅन्सी, एथनिक कुर्त्यांसाठी ग्रेट बाईज, शॉप नारी, जयपूर कुर्ती, सोच, फॅशोर, रंगरिती, इंडिया रश, लक्षिता ऑनलाइन, क्राफ्टस्व्हिला, मीनाबाजार अशा वेबसाईटस पाहू शकतात. आकर्षक, गडद रंग, नाजूक रेशीम, जरीचा काठ असलेली नऊवारी साडी असो की, अस्सल सिल्क,कॉटन साडी. हटके साडी हवी असेन तर ऑनलाइन शॉपिंगचा फंडा ट्राय करायला काहीच हरकत नाही. युनिक साडय़ांकरिता सखी फॅशन्स, पीच मोड, पवित्रा, झिपकर, सारीडॉटकॉम, इतफॅब, इंडियन वेडिंग सारीज ट्राय करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या