मणिपूरमध्ये राजकीय भूकंप, सत्ताधारी भाजपच्या 3 आमदारांसह उपमुख्यमंत्री व 3 मंत्र्यांचा राजीनामा

4570

एकीकडे संपूर्ण देश कोरोना महामारीचा सामना करत असताना दुसरीकडे मणिपूर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. सत्ताधारी भाजपच्या 3 आमदारांसह उपमुख्यमंत्री आणि 3 मंत्र्यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच सरकारला पाठिंबा देणाऱ्या एका टीएमसी आमदाराने आणि अपक्ष आमदाराने पाठिंबा काढून घेतला आहे. यामुळे भाजप सरकार गोत्यात आले आहे.

एस. सुभाषचंद्र सिंह, टी.टी. हाओकिप आणि सॅम्युअल जेंदई या भाजप आमदारांनी पक्षाला रामराम करत काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. यासह नॅशनल पिपुल्‍स पार्टी (एमपीपी) चे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री वाय. जयकुमार सिंह, मंत्री एन. कायिसी, मंत्री एल. जयंत कुमार सिंह आणि लेतपाओ हाओकिप यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसचे आमदार टी रबिंद्रो सिंह आणि अपक्ष आमदार शहाबुद्दीन यांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या