पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग

pm-modi

पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून ठेवण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपली बाजू मांडण्यासाठी भाषण सुरू केलं आहे. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे स्वातंत्र्य काळापासून यूपीए सरकार पर्यंतच्या काळातील गोष्टींवरून काँग्रेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र तास-सव्वा तासाचे भाषण झाल्यानंतरही कुठेही मणिपूरचा उल्लेख नसल्यानं विरोधकांनी तुफान घोषणाबाजी केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या घोषणा थांबवण्याची सूचना केली. मोदींनी यानंतर पुन्हा भाषण सुरू केलं, मात्र मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी येत नसल्यानं विरोधकांनी पुन्हा एकदा मणिपूर… मणिपूर… च्या घोषणा सुरू ठेवल्या.

यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर काही वक्तव्य केलं नाही. अखेर विरोधकांनी वॉकआऊट केलं. त्यानंतर मोदी यांनी विरोधकांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न केले. मग मात्र त्यांनी मणिपूर या विषयावर मोदी आले आणि त्यांनी देश मणिपूरसोबत असल्याचा विश्वास दिला.

 

पाहा पंतप्रधान मोदींचे भाषण :