मणिपुरात हिंसाचार सुरूच, केंद्रीय मंत्र्याच्या घरावर हल्ला!

आरक्षणाच्या मुद्दय़ावरून 3 मे पासून पेटलेले मणिपूर अद्याप शांत झालेले नाही. इंफाळसह राज्यभरात हिंसाचार, आगडोंब सुरूच आहे. इंफाळ येथे संतप्त जमावाने केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. आर. के. रंजनसिंह यांच्या घरावर हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा रंजनसिंह घरामध्ये होते. सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केल्यामुळे जमाव तेथून गेला.

राजधानी इंफाळच्या पूर्व भागात काsंगबा बाजार परिसरात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रंजनसिंह यांचे निवासस्थान आहे. दोन दिवसांपूर्वी ते मणिपूर दौऱयावर आले होते. गुरूवारी रात्री शेकडोंच्या जमावाने रंजनसिंह यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यामुळे खळबळ उडाली. डॉ. रंजनसिंह यांच्या सुरक्षेसाठी तैनात रॅपिड अॅक्शन पर्ह्सच्या जवानांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने तोडपह्ड सुरू केली. सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या. त्यानंतर जमाव तेथून गेला. या हल्ल्यात डॉ. रंजनसिंह थोडक्यात बचावले. दरम्यान, मणिपूरचे सार्वजनिक बांधकाममंत्री काsंटूओजाम गोविंददास यांच्या निवासस्थानावरही जमावाने हल्ला केला.

3 मेपासून आगडोंब, गृहमंत्री शहा आता मणिपूरला जाणार

मणिपूरमध्ये मैतेई समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. या आरक्षणाला नागा आणि कुकी समाजाचा विरोध आहे. त्यामुळे मणिपुरात 3 मे पासून आगडोंब सुरू आहे. हिंसाचारात 70 वर लोकांचा मृत्यू झाला. शेकडो घरांची राखरांगोळी झाली. हजारो लोकांना घरेदारे सोडावी लागली. मात्र, मणिपूर जळत असताना पेंद्रातील मोदी सरकार कर्नाटकात विधानसभा निवडणूक प्रचारात गुंतले होते. आता तब्बल 28 दिवसांनंतर सोमवारी (दि. 29) गृहमंत्री अमित शहा मणिपुरला भेट देणार आहेत.