टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूची ‘विकेट’ पडली, अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात अडकला

2469

टीम इंडियाचा मधल्या फळीतील महत्त्वाचा खेळाडू मनिष पांडे दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत विवाहबंधनात अडकला आहे. सोमवारी या दोघांनी मुंबईमध्ये वैदिक पद्धतीने लग्न केले. आयपीएलमधील फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडियावर फोटो शेअर करून दोघांच्या चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे.

या अभिनेत्रींची या क्रिकेटर्ससोबत जोडली नावं

रविवारी सय्यत मुश्ताक अली स्पर्धेची फायनल खेळली गेली. यात तमिळनाडूकडून खेळताना पांडेने 60 धावांची मॅचविनिंग खेळी करत संघाला स्पर्धा जिंकून दिली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सोमवारी मनिष पांडे थेट लग्नमंडपात उतरला. मुंबईमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या गोतावळ्यामध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. मूळचा बंगळुरूचा असणाऱ्या मनिष पांडे याच्या लग्नाचा हा सोहळा दोन दिवस सुरू राहणार आहे. या सोहळ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे.

कोण आहे अश्रिता शेट्टी?
16 जुलै, 1993 रोजी जन्मलेली अश्रिता शेट्टी ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिने 2010 मध्ये ‘क्लीन एंड क्लियर फ्रेश फेस’ ही सौंदर्याची स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर ती अनेक जाहिरातींमध्ये दिसून आली. यानंतर तिने 2012 ला ‘तेलिकेडा बोल्ली’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. आतापर्यंत तिने 26 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या