
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला हिला इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली आहे. ही माहिती स्वतः मनीषा कोईराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. दीक्षांत समारंभातील फोटोसुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आज मला ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली. हा सन्मान मी शब्दांत सांगू शकत नाही. तुम्ही कुठूनही सुरुवात करा. तुमचा प्रवास महत्त्वाचा आहे. माझ्या आयुष्यातील मूल्य पाहण्यासाठी ब्रॅडफोर्ड विद्यापीठाला मनापासून धन्यवाद. पुढे चला. चमकत राहा, असे मनीषाने पोस्टमध्ये म्हटले आहे.