मनीषा कोईरालाच्या डिअर मायाचा ट्रेलर प्रदर्शित

सामना ऑनलाईन । मुंबई

बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मनिषा कोईराला बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करत आहे. आगामी डिअर माया या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिअर माया या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात मनिषा एका वृद्धेच्या भूमिकेत दिसणार आहे, जिला अचानक प्रेमपत्र येऊ लागतात. त्या प्रेमपत्रामुळे तिच्या आयुष्यात बदल होतो. पण, या प्रेमपत्रांच्या मागेही एक कहाणी आहे. ती नेमकी काय.. ते या ट्रेलरमधून आपल्याला पाहायला मिळेल.

मन, दिल से, खामोशी, बॉम्बे, क्रिमिनल, अकेले हम अकेले तुम अशा चित्रपटांमधून मनिषाने अभिनय केला आहे. २०१२ मध्ये तिला कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. मात्र, आजाराला मात देत ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सिद्ध झाली आहे. सुनयना भटनागर दिग्दर्शित डिअर माया हा चित्रपट २ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा डिअर मायाचा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या