उन्मुक्तनंतर ‘अशी’ कामगिरी करणारा कालरा दुसरा हिंदुस्थानी खेळाडू

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने दणदणीवत विजय मिळवत हिंदुस्थानने चौथ्यांदा विश्वचषक उंचावला. अंतिम सामन्यात सलामीवीर मनजोत कालरा विजयाचा नायक ठरला. कालराने १०२ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह १०१ धावांची नाबाद खेळी केली. या दमदार खेळीसह अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा दुसरा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. मनजोत कालराला उन्मुक्त चंद, ब्रेट विल्यम्स, स्टिफन पिटर्स आणि जेराड ब्युर्क या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे. २०१२ मध्ये झालेल्या विश्वचषकात उन्मुक्त चंदने फायनलमध्ये शतकी खेळी करत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला होता.

विश्वचषकात टीम इंडियाच्या ‘या’ खेळांडूंची ५ स्टार कामगिरी

ऑस्ट्रेलियाने विजयसाठी दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार पृथ्वी शॉ सोबत मनजोत कालरासोबत सलामीला मैदानात उतरला. सुरुवातील सावध खेळणाऱ्या कालराने नंतर आक्रमक खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांवर नियंत्रण मिळवले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी झाली. त्यानंतर गिलसोबत मनजोतने संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. गिल बाद झाल्यानंतर मनजोतने जबाबदारीने खेळत शेवटपर्यंत मैदानावर तंबू ठोकला आणि शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

फायनलमध्ये मनजोतने केलेल्या शतकी खेळीचे कर्णधारानेही मनसोक्त कौतुक केले. या खेळीबद्दल त्याला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बोलताना मनजोत म्हणाला की, फलंदाजीसाठी ही खेळपट्टी पोशक होती त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करत असताना फारसा त्रास जाणवला नाही. तसेच मनजोतने प्रशिक्षक राहुल द्रविडसह सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या