मंजू राणीने पदार्पणातच इतिहास घडवला, जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

हिंदुस्थानच्या मंजू राणीचे जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धेत पदार्पणातच सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न अखेरीस भंगले असले तरी तिने रौप्यपदक पटकावून नवा इतिहास घडवला. मंजूने अंतिम लढतीत यजमान रशियाच्या एकातेरिनाला स्तुत्य अशी झुंज देत 48 किलो वजनी गटाचे रौप्यपदक आपल्या नावावर केले. सुमारे 18 वर्षांनंतर जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचून पदक पटकावणारी मंजू मेरी कोमनंतर दुसरी हिंदुस्थानी बॉक्सर ठरली.

48 किलो वजनी गटात मंजू राणीला अंतिम फेरीत रशियाच्या एकातेरिना पाल्टसेवाकडून पराभवाचा सामना करावा लागला. रशियन खेळाडूने अंतिम सामन्यात पूर्णपणे आपले वर्चस्व गाजवले  होते. मंजूच्या पराभवानंतर हिंदुस्थानचे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आले आहे. हिंदुस्थानकडून मंजू राणीने रौप्य, तर मेरी कोम, जमुना बोरो आणि लवलीना यांनी कास्य पदकाची कमाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या