मंजुळा शेट्य़े मृत्यू प्रकरण; तिघा महिला तुरुंग कर्मचाऱ्यांना जामीन नाकारला

सामना प्रतिनिधी । मुंबई

मंजुळा शेट्य़े हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बिंदू नाईकोडी, वसिमा शेख आणि सुरेखा गुळणे या तुरुंग कर्मचाऱ्यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावले. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले असले तरी या तिघांवरील गंभीर आरोप पाहता त्यांना जामीन मंजूर करता येणार नाही, असे सत्र न्यायाधीशांनी नमूद केले. भायखळा येथील महिला कैद्यांसाठी असलेल्या तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्य़े हिला २३ जून २०१७ रोजी जबर मारहाण करण्यात आल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारागृह अधीक्षिका मनीषा पाखरेकरसह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी असलेल्या तिघांच्या अर्जावर आज निकाल देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या