‘मनमर्जीया’मधील गाण्याला लाखो रसिकांची पसंती

48

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मनमर्जीया’ मधील मधुर असे गाणे शाहीद मल्ल्या आणि अम्मी विर्क यांनी गायले असून शेलीचे अर्थपूर्ण बोल त्याला लाभले आहेत. त्यामुळे हे गाणे ज्यांना रोमँटिक गाणी आवडतात अशा प्रत्येक रसिकाच्या संग्रहामध्ये आपले स्थान मिळवेल. हे गाणे रुमी (तापसी पन्नू),रॉबी (अभिषेक बच्चन) आणि विकी (विकी कौशल) यांच्या नातेसंबंधांमधील गुंतागुंत अधोरेखित करते. या गाण्यातून प्रेमाचा त्रिकोण समोर येतो. अनुराग कश्यप यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटातील ही कथा आहे. ‘मनमर्जीया’ चित्रपटातील या गाण्यासाठी शाहीद मल्ल्याला खूप वाहवा मिळाली आहे. या गाण्याला केवळ दोनेक दिवसांत 30 लाखांहूनही अधिक हिट मिळाल्या असून हा एक दमदार पंजाबी प्रेमपोवाडा असल्याची पोचपावती त्याला मिळाली आहे. शाहीद ने ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटातील ‘गुरबानी’ या गाण्यातून आपले चित्रपटातील पदार्पण केले, पण त्याला बॉलीवूड चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला तो पंकज कपूर यांचे पहिले दिग्दर्शन असलेल्या ‘मौसम’ या चित्रपटात. या चित्रपटाने ‘रब्बा’ आणि ‘इक तूही तूही’ या दोन सुपरहिट गाण्यांचे श्रेय त्याला मिळवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या