‘मन की बात’ मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश

382

‘स्वच्छ भारत’ अभियानानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात ‘प्लॅस्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात प्लॅस्टिकमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी ही माहिती दिली.

केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यानंतर मोदींनी तिसऱ्यांदा ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केले. 2 ऑक्टोबरपासून देशात प्लॅस्टिकमुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात हे आंदोलन उभारले जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. प्लॅस्टिक पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत पिशवी आणावी, असं अनेक व्यापारी आणि दुकानदारांनी दुकानांबाहेर लिहिलंय. यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. प्रत्येक नागरिकाने या आंदोलनात  आपलं योगदान द्यावं, असं आवाहन मोदींनी जनतेला केलंय.

‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान 11 सप्टेंबरपासून राबवण्यात येईल. दरवर्षी आपण 29 ऑगस्टला ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करतो. या निमित्ताने आपण ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ म्हणजे ‘तंदुरुस्त भारत अभियान’ सुरू करणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. जागृकतेअभावी कुपोषणाची समस्या गरीबांसह सधन कुटुंबांमध्येही दिसून येत आहे. यामुळे सप्टेंबर महिना ‘पोषण अभियान’ म्हणून राबवला जाईल. नागरिकांनी यात सहभागी व्हावं आणि आल्यापरिने योग्य ते सहकार्य करावं, असं आवाहन मोदींनी जनतेला केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या