पद्मभूषण हा पर्रीकर यांच्यावर अन्यायच, गोव्याचे आमदार मोदींना लिहिणार पत्र

818

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. पर्रीकर यांना अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांच्या तोडीचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर व्हायला हवा होता. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांना गोमंतकीयांच्या भावना कळवणार असल्याची माहिती पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पणजी भाजप मंडळाच्या वतीने भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना मोन्सेरात यांनी आपली खंत बोलून दाखवली. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यात आमदार मोन्सेरात यांनी व्यक्त केलेल्या खंतीमुळे हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.

parrikar

आपली प्रतिक्रिया द्या