दिल्ली डायरी-मला जाऊ द्या ना घरी!

92

सर्जिकल स्ट्राइकनंतर देशातील मीडियाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना हीरो वगैरे बनवले होते. या स्ट्राइकमुळे देशातील दहशतवाद आणि नक्षलवाद संपला असे शाब्दिक तोफगोळे सत्ताधाऱयांकडून मोठय़ा आवेशात डागले जात होते. मात्र देशातील वाढत्या घातपाती कारवायांनी सर्जिकल स्ट्राइकच्या स्वप्नाळू मनोरथांना फटाके लावले आहेत. सीमेवर दहशतवादी कारवाया, घुसखोरी सुरूच आहे तर दुसरीकडे लष्करामध्ये कधी नव्हे इतकी अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षणमंत्री कुठे आहेत, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

गोव्याच्या रणधुमाळीत पर्रीकर हे फोंडा, मडगाव अशा ठिकाणी भाजपच्या सभा गाजवत मडगावातून इस्लामाबाद आणि बीजिंगला खबरदार…’ अशी क्षेपणास्त्रडागत आहेत. देशाच्या संरक्षण आणि गृहमंत्र्यांनी सामान्यपणे दिल्लीतच राहावे आणि अतिशय मोजके बोलावे असा प्रघात आहे. मात्र पर्रीकरांनी बोलण्याच्या प्रघाताला कधीच तिलांजली दिली आहे. ‘घार उडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशीअशी त्यांची अवस्था आहे. पंतप्रधानांनी मोठय़ा विश्वासाने त्यांच्याकडे देशाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली. मात्र मनोहरपंतांचे लक्ष गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरच अधिक आहे.

गोव्यात पुन्हा भाजपची सत्ता आली तर श्रीपाद नाईक मुख्यमंत्री होतील त्यासाठी त्यांचा मुलगा जागा रिकामी करेल या भीतीपोटी पर्रीकरांनी नाईकांच्या मुलाचे तिकीट कापले. तसेच आपला उत्तराधिकारी नेमताना नाईकांऐवजी लक्ष्मीकांत पार्सेकर नावाच्या तकलादू नेत्याकडे गोव्याची धुरा देऊन आपल्या घरवापसीची संभावना बळकट केली होती, मात्र एवढे करूनही मोदींची खास मर्जी बसल्याने आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाठवले जाईल की नाही या शंकेने पर्रीकर ग्रस्त आहेत. त्यांनी त्यासाठीच संसद अधिवेशनात गोव्याचे प्रभारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एका कोपऱयात खास भेट घेतली. तुमचे आणि नागपूरचे एकदम खास आहे. तुम्ही तिकडे माझ्याबाबत सांगितले आणि नागपुरातून दांडपट्टाफिरला तर दिल्लीतून माझी सुटकाहोईल. माझ्यासाठी एवढे करा असे आर्जव त्यांनी गडकरींना केले. देशाचे संरक्षणंत्री मला जाऊ द्या ना घरीअसे आर्जव करत आहेत. बघूया. नागपूरकर आणि गडकरी काय करतात ते!

आपली प्रतिक्रिया द्या