कपडे काढा आणि नागडे नाचा,पर्रीकरांची पत्रकारांवर आगपाखड

परखडपणे लिखाण करणाऱ्या पत्रकारांवर केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आगपाखड केली आहे. उगाच वायफळ बडबड करणाऱ्या पत्रकारांनी कपडे काढून नागडं नाचावं असं धक्कादायक वक्तव्य पर्रीकर यांनी केलं आहे.
पणजीपासून जवळपास ४० किलोमीटर दूर असलेल्या सात्तारी इथे भाजपाची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. या सभेत बोलताना त्यांनी म्हटलं की “मला आठवतंय की १९६८ मध्ये अमेरिकेतील वॉटरगेट घोटाळ्याबाबतएका संपादकाने संपादकीय लिहलं होतं, जे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना उद्देशून होतं. मला सांगा हे संपादकीय त्यांच्यापर्यंत कसं काय जाणार? निक्सन अमेरिकेत होते”
पुढे पर्रीकर म्हणाले की “काही लोकांना त्यांच्या मर्यादा कळत नाही ते उगाच बडबडत बसतात,माझा त्यांना एक चांगला सल्ला आहे कपडे काढा आणि नागडे नाचा”
एका वृत्तपत्राबाबत बोलताना त्यांनी ही खालच्या पातळीवरील टीका केली. पर्रीकर म्हणाले की “मी त्या वृत्तपत्राचं नाव घेणार नाही,त्या वृत्तपत्राचे संपादक हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संपादक होते, त्यांना वृद्धापकळात इथे आणलं होतं, आणि त्यांच्या वृत्तपत्राचा खप हा १००० इतका होता.