नाटय़ निर्मात्याची फसवणूक प्रकरणी दाखल गुह्यात मनोज जरांगे-पाटील यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी जरांगे-पाटील आज येथील न्यायालयात हजर झाले असता न्यायालयाने तीन हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्याचा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हा आदेश दिला. विशेष म्हणजे उपोषणामुळे प्रकृती खालावली असल्याने जरांगे-पाटील रुग्णवाहिकेतून सलाईनसह न्यायालयात आले होते. समाजमाध्यमांमध्ये न्यायालयाबद्दल अवमानकारक बोलत असल्यास जरांगे-पाटील यांनी बोलताना काळजी घ्यावी, अशी सूचना न्यायालयाने जरांगे-पाटील यांना केली आहे.