दिल्लीत भाजपचे केजरीवाल सरकार विरोधात आंदोलन, खासदार मनोज तिवारी पोलिसांच्या ताब्यात

1223

राजधानी दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल कोरोनाचे संकट हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका भाजपने केली आहे. म्हणून भाजपने दिल्लीत आंदोलन केले आहे. या प्रकरणी दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खासदार मनोज तिवारी राजघाटावर आंदोलन करत होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना आणि साथीदारांना पोलीस स्थानकात नेले. भाजप नेते कुलदीप चहल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका करत म्हणाले की केजरीवाल निष्काळजीपणामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. केजरीवाल कुंभकर्णासारखे झोपले असून त्यांना जागं करण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. परंतु दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक केली आहे असे चहल यांनी म्हटले आहे.

भाजपने दिल्ली सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. मग कोरोनाचा प्रश्न असो वा मजुरांचा. दिल्ली सरकार या सगळ्या प्रकरणात ठार अपयशी ठरल्याचे भाजपने म्हटले आहे. तसेच केजरीवाल कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या